शिरोळ ( प्रतिनिधी ) : द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा कोल्हापूर यांच्यावतीने फुलेवाडी, येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अन्सार शेख,,सचिन कदम,राहुल माने,जीवन मोहिते,अनिल शिंदे,सुषमा पाटील,अरविंद देसाई,अभिषेक डोंगळे,प्रकाश पाटील यांचे जिल्हाध्यक्ष सागर शेळके, उपाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी , सचिन गवळी, नारायण लोहार व इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी सुषमा पाटील यांनी पत्रकारांची जबाबदारी, लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसारमाध्यम ,द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर शाखेचे अभिनंदन केले.
पत्रकार व लोकशाही याचा समन्वय कसा राखला पाहिजे हे विशद केले.अन्सार शेख यांनी द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्याबद्दल माहिती दिली.पत्रकार कसा असायला हे नमूद केले.अनिल शिंदे एअरपोर्ट डायरेक्टर यांनी काम करणाऱ्याला पुरस्कार म्हणजे चांगल्या कार्याची पोचपावती ,कर्तॄत्ववान माणसाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली की त्यांच्या कार्याला आणखी गती मिळते असे सांगितले.
गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी पत्रकार आपल्या माध्यमातून समाजावर चांगले संस्कार करतात.चांगले काम करणाऱ्याला पुरस्कारामुळे आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते असे सांगितले.अरविंद देसाई यांनी पत्रकार व पुरस्कार प्राप्त सत्कारमुर्तींचे अभिनंदन केले.कर्तॄत्ववान माणसाच्या कार्याला पुरस्काराने काम करण्याची अधिक गती वाढते असे सांगितले.
यावेळी सत्कारमुर्ती दिलीप भिसे,संजय गायकवाड,राहुल कुंभार, सखाराम भणगे, सुभाष जामदार ,अशोक दरेकर, ईश्वरा गायकवाड, बाबुराव घुरके तसेच इतर सत्कारमुर्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.