कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील तानाजी आनंदा सुर्यवंशी यांचे एसटीमध्ये ४० हजार रुपये खिशातून पडलेले होते. पाटपन्हाळा येथील रोहित कातळे आणि विकी कातळे यांनी प्रामाणिकपणे परत केले. या प्रामाणिपणाबद्दल दोघांचे परिसरातून कौस्तुक होत आहे. 

पाटपन्हाळा ते रंकाळा एसटीतून विकी कातळे व रोहित कातळे हे कोल्हापूरला निघाले होते. दरम्यान याच एसटीतून कळे येथे तानाजी सुर्यवंशी हे मलकापूर येथे जुनी दुचाकीचे पैसे देण्यासाठी खिशातून ४० हजार रुपये घेऊन निघाले होते. दरम्यान रंकाळा येथे एसटीतून तानाजी उतरून काही अंतरावर गेले असता त्यांना खिशात पैसे नसल्याचे समजले. त्यांनी एसटीमध्ये पाहणी केले असता पैसे काही सापडले नाही. 

यावेळी रोहित कातळे व विकी कातळे यांना ते पैसे सापडले. त्यांनी रंकाळा आगारवर पैसे कोणाचे पडले आहेत का ? अशी चौकशी केली असता कोणीही तयार झाले नाही, मग त्यांनी पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या सोशल मिडियावर पैसे सापडल्याचे मेसेज आणि आपला मोबाईल क्रमांक व्हायरल केला.

तसेच रोहित आणि विकी कातळे यांनी कळे पोलीस ठाण्यात सापडलेले पैसे सुर्पूद केले. यावेळी तानाजी सुर्यवंशी यांची शहानिशा करून कळे पोलिस ठाण्याचे सपोनि.रणजीत पाटील, रोहित कातळे यांच्या हस्ते त्यांना पैसे सुर्पूद करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच संदीप पाटील, महादेव पाटील, स.फौ.महादेव खाडे, पोलीस हवलदार सरदार भोसले, संदीप पाटील, समाधान गुरव, बाजीराव कांबळे आदी. उपस्थित होते.