कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सवी वर्ष आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती यानिमित्ताने इतिहास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षी शाहूंच्या जीवनकार्याला उजाळा देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद वि. रा. शिंदे सभागृह, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक येथे होणार आहे.

या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण असणार आहेत.  प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण आणि कॉ. उमेश सूर्यवंशी हे वक्ते असणार आहेत. प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण हे राजर्षी शाहू आणि स्त्री शिक्षण याविषयावर तर  कॉ. उमेश सूर्यवंशी राजर्षी शाहूंच्या कार्याचे वेगळेपण याविषयावर बोलणार आहेत. मंगळवार, दिनांक 4 फेब्रुवारी रोजीसकाळी 9 .30 वाजता ही परिषद होणार आहे.