कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचा बिगुल काही दिवसातच वाजणार आहे.त्याच अनुषंगाने आता राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय नेते ठिकठिकाणी सभा ,दौरे करत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना याबाबत कोल्हापुरात माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आता विचार करण्याचं काहीच कारण नाही असं उत्तर पवार यांनी दिलय.मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा संख्याबळावरती होईल असंही शरद पवारांनी म्हटलय.

काय म्हणाले शरद पवार ?

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचं आत्ताच काही कारण नाही, विधानसभा निवडणूक निकालानंतर संख्याबळानंतरच मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल हे ठरेल. मुख्यमंत्री पदाबाबत आत्ताच विचार करण्याच काहीही कारण नाही. अनेक वेळेला असं घडलं, नेतृत्त कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्या असेल तेव्हा निर्णय घ्यायचा असतो. अद्याप कशाचा काही ठरलेलं नाही. बहुमत नाही, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, यात काही शंका नाही, पण आत्ताच काही निर्णय घेण्याची आवश्कता नाही, असंही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.