टोप (प्रतिनिधी) : बांगलादेशमध्ये हिंदुवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील समस्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बांगलादेशमधील हिंदूवर होणारे अत्याचार तात्काळ न थांबवल्यास हिंदू स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी निवेदानाद्वारे देण्यात आला.
हातकणंगले तालुक्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदुवर होणारे अत्याचाराच्या निषेधार्थ हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत असून चिन्मयकृष्ण दास यांनी अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आले आहे. या घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे. तसेच बांगलादेशात हिंदूसमाजाचे व्यवसाय आणि मंदिरांची नासधुस केली आहे.
तरी हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात भारतात प्रचंड रोष असून हा मोर्चा त्यासाठी काढण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. तरी हिंदुबाबत योग्य ते पाऊल उचलावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.