मुंबई : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवीयन आरोपीच्या सुरक्षित सुटकेसाठी कोणी आणि कसे प्रयत्न केले हे आता उघड होऊ लागले आहे. या प्रकरणी अल्पयीन आरोपी वेदांत अग्रवालच्या ब्लड सॅम्पल प्रकरणी ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यावर राज्य सरकारने एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. एसआयटीच्या अध्यक्ष म्हणून पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विरोधकांनी पल्लवी सापळेंच्या नियुक्ती करण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती ही वैद्यकीय शिक्षण आयुक्तांच्या मार्फत होते. डॉ. पल्लवी सापळे यांची पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणाच्या एसआयटी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप नाही, असे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटले आहे.

नियुक्ती करण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप नाही
डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती ही वैद्यकीय शिक्षण आयुक्तांच्या मार्फत होते. डॉ. पल्लवी सापळे यांची पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणाच्या एसआयटी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एबीपी माझा’ला माहिती दिली आहे. आयुक्तांकडून सेवा ज्येष्ठतेनुसार पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून पल्लवी सापळे यांना तत्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच तत्काळ योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांवरील कारवाई तांत्रिक कारणस्तव अडकू नये यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून एसआयटीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.