कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले असून महायुती सरकारने बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. निकाल लागल्यानंतर काही राजकीय नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर आरोप केलेत. अशातच आता, कष्टकरी मतदार महिला – लाडक्या बहिणी पर्यंत कोणत्याही सर्वे कंपनी पोहोचल्या नसल्याने त्यांना या निकालाचा अंदाज घेता आला नसल्याचं वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांनी केलं आहे.

प्रशांत दीक्षित काय म्हणाले..?

प्रशांत दीक्षित म्हणाले, महायुतीला भरघोस मतदान करणाऱ्या 51 टक्के महिलापर्यंत माध्यमे आणि सर्वेक्षणे फारशे पोहोचले नव्हते. त्यामुळे लाडकी बहिण योजनेमुळे बदललेली महिलांची मानसिकता कोणाच्याच लक्षात आली नाही. ही योजना जात, पंथ, धर्म यांच्या सीमा पार करून गेली. त्यामुळेच 22 टक्के मुस्लीम महिलांनी महायुतीला मतदान केले आहे. सुरूवातीला महाविकास आघाडीने ही योजना गांभीर्याने घेतली नाही. या योजनेला विरोधाचाही सूर त्यांनी लावला आणि नंतर 3 हजारांची घोषणा करून ही योजना लोकमान्य करून टाकली असल्याचं वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांनी केलं आहे.