कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने माजी गृहराज्‍यमंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी डी.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्या गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सतेज उर्फ बंटी डी.पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच गोकुळ परिवाराच्यावतीने भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी गोकुळने रमजान ईद दिनी दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित करून २२ लाख ३१ हजार लिटर्स दुधाची विक्रमी दूध विक्री केलेबद्दल गोकुळचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ, दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक, दुधसंस्था, कर्मचारी, अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे आमदार सतेज पाटील यांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी संघाचे याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम उपस्थित होते.