हैदराबाद : नागा चैतन्य हा दाक्षिणात्य सुपरस्टार आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाचा हळदी सोहळा पार पडला आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. या पारंपरिक हळदी समारंभावर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला हे दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाच्या हळदीला फक्त जवळचे लोक या सहभागी झाले होते.

हे दोघेही एकत्र बसून कार्यक्रमाचा आनंद लुटताना दिसत आहेत. एक चित्र खूपच रोमँटिक आहे ज्यामध्ये नागा त्याच्या भावी पत्नीला बघताना दिसत आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा हळदी सोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला आहे. नागाने हळदीला कुर्ता पायजमा घातला होता,तर शोभिताने दोन पोशाख घातले होते. प्रथम ती पिवळ्या रंगाच्या पारंपारिक ड्रेसमध्ये दिसली होती ज्यामध्ये तिचे कुटुंबीय तिला पाण्याने आंघोळ घालताना दिसत आहे.

तर अभिनेत्री शोभिता हात जोडून पोज देत असताना दिसत आहे तर कधी हसताना दिसते आहे. नागा चैतन्य पुन्हा एकदा वर बनण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो अभिनेत्री शोभिता धुलिपालाला आपली वधू बनवून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. आज म्हणजेच २९ नोव्हेंबरला हैदराबादमध्ये दोघांचा हळदी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे.