मुंबई (प्रतिनिधी) : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सहभागाच्या चर्चेमुळे पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये सक्रिय असलेली लॉरेन्स बिष्णोई टोळी महाराष्ट्रातही दहशत पसरवत आहे.त्यांच्या निशाणावर सलमान खान शिवाय आता कॉमेडियन मुन्नवर फारूकी देखील असल्याची माहिती समोर आली आहे. मागील महिन्यात त्याला निशाण्यावर धरण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी त्याची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

पोलिसांकडून ही माहिती मिळाली…


पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी की, बिष्णोई गँगपासून कॉमेडियन मुनव्वरला धोका होऊ शकतो. परंतु, त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बिष्णोई गँगच्या काही सदस्यांनी मागील महिन्यात दिल्लीत त्यांच्या हत्येचा तथाकथित प्रयत्न केला होता आणि मुनव्वरचा पाठलाग केला होता. गुप्तचर यंत्रणेला याची माहिती वेळीच मिळाली आणि त्यांनी कारवाई करून मुनव्वरला घटनास्थळावरून सावधगिरीने हे प्रकरण हाताळले. त्याचबरोबर, फारूकी आपल्या कॉमेडी शोमध्ये ईश्वरावर कॉमेंट केल्यानंतर वादग्रस्त ठरलेला होता.