कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील बोरगांव – अब्दुललाट मार्गावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला, तंबाखू आणि गुटखा जप्त करण्यात आला आहे. 27 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वा. प्रमोद कोळी यांच्या पोल्ट्री परिसरात ही घटना घडली. संशयित आरोपी रमेश दादु टोणपे, वय 21, राहणार शिरदवाड, ता. शिरोळ, यांनी महिंद्रा स्कॉर्पिओ चारचाकी (गाडी नंबर एम.एच.11 ए.ई.1212) मध्ये विविध पान मसाला आणि गुटखा उत्पादने बेकायदेशीररित्या वाहतूक करताना आढळले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण 6,83,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात विविध प्रकारचे पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ, तसेच 4 चाकी वाहनांचा समावेश आहे. संशयित आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 364 /2024 आणि अत्र सुरक्षा आणि मानदे अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई साहेब पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केली.
पोलीस नाईक यादव यांनी फिर्याद दाखल केली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करत आहेत.