कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथील मातंग वस्तीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करुन समाजातील अबालवृध्दांना खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पुजन सुवर्णा बनसोडे आणि पुष्पहार अर्पण पाखरे यांनी केले. तसेच संघर्ष बहूजन सेनेचे जिल्हाध्यक्ष सात्ताप्पा पोवार, समता सैनिक दलाचे पन्हाळा तालुका सचीव अरुण पोवार आणि मातंग समाजाचे पन्हाळा तालुका उपाअध्यक्ष प्रकाश बनसोडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

यावेळी हणमंत बानसोडे, शोभा बनसोडे, राधाबाई वडर, दिपक पोवार, मारुती पाखरे, विद्या बनसोडे, पद्मा बनसोडे, सखुबाई बनसोडे, पार्थ बनसोडे, वरद वडर, अर्नव पाखरे, वरद बनसोडे, शंभू पाखरे, विराज पाखरे, आवनेश पाखरे आदी उपस्थित होते.