कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या आणि शहर शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात अभिवादन करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘अमर रहे-अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे..’  अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख रविभाऊ चौगुले, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, माजी नगरसेवक राजू हुंबे, किशोर घाडगे, जयवंत हारुगले, सुनिल जाधव, अरुण सावंत, रघुनाथ टीपुगडे, उदय भोसले, अश्विन शेळके, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, यांच्यासह शहर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.