देवगड (प्रतिनिधी) – इंद्रधनू देवगड आयोजित आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य नवरात्र उत्सव 2024 चे आयोजन3 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत तारी कंपाऊंड, हॉटेल आनंद रामाणे शेजारी देवगड मेनरोड येथे दांडिया नृत्य सह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आले असल्याची माहिती इंद्रधनु देवगड या संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी, व सचिव प्रशांत वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवारी सायंकाळी देवगड तालुका व्यापारी संघाच्या कार्यालयात इंद्रधनु देवगड संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिलिंद मोर्ये, दिनेश पटेल, किसन सुर्यवंशी, आनंद रामाणे, दयानंद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमदार नितेश राणे पुरस्कृत इंद्रधनू देवगड आयोजित नवरात्र उत्सवासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

3 रोजी रात्री 9.30 वाजता उद्घघाटन व दांडीया नृत्य, 12 रोजी भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा रात्री ८ वाजता खुल्या व लहान गटात होणार आहे. खुला गट 18 वर्षावरील प्रथम क्रमांक 8 हजार व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक ५ हजार रुपये व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक 3 हजार रुपये व सन्मान चिन्ह, लहान गट 5 ते 18 वर्षे पर्यंत गटासाठी प्रथम क्रमांक 5 हजार रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक 3 हजार रुपये व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक 2 हजार रू. व सन्मान चिन्ह, खुल्या ग्रुप दांडीया स्पर्धा 13 रोजी सायंकाळी 7 पासून सुरु होणार आहेत.

यासाठी प्रथम क्रमांक 25 हजार रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक 15 हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक 10 हजार रुपये व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत.तसेच दांडीया किंग व क्वीन, बेस्ट स्माईल, बेस्ट कॉशुम आदी सर्व पारितोषिके आमदार राणेंनी पुरस्कृत केले आहेत. तसेच लक्षवेधी चेहरा, बेस्ट कॉसुम, बेस्ट स्माईल, नवोदित चेहरा आदी पारितोषिके दररोज देण्यात येणार आहेत. दररोज दहा ते बारा पारितोषिके विजेत्यांना दिली जाणार आहेत. १३ रोजी आमदार नितेश राणेंच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. या नवरात्र उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रसाद कुळकर्णी व प्रशांत वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.