मुंंबई – संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर दिली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे निवडणूक चिन्ह दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

गेल्या वर्षभरात आम्ही पक्ष म्हणून आमची संघटना घराघरात पोहोचवली, आता आम्हाला मिळालेले निवडणूक चिन्ह सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावरील प्रेम, पक्षसंघटना आणि हितचिंतकांची मेहनत, राज्याच्या राजकारणात नव्या आणि सुधारलेल्या पर्यायाची गरज आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करणार हे निश्चित, परिवर्तन महासत्तेला सत्तेपर्यंत नेणार! अस त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.

संभाजीराजेंनी 9 ऑगस्ट 2022 रोजी स्वराज्य संघटनेची स्थापन केली होती. या संघटने अंतर्गत त्यांनी शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी लढा सुरू केला होता.