कोल्हापूर ( प्रतिनिधी ): गेल्या दोन आडिच वर्षांपासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वयाचाही विचार न करता नराधम महिलांवर अत्याचार करतात. महिला सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याऐवजी हे एक फुल दोन हाफ सरकार केवळ योजनांच्या श्रेयवादात गुंतलेले आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये राज्याचे गृहमंत्री अपयशी ठरले आहेत असे मत आज शिवसेना उपनेते ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यात राबविण्यात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची स्त्री शक्ती संवाद यात्रा बैठक कोल्हापूर सर्किट हाऊस येथे संपन्न झाली यानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे प्रमुख उपस्थित होत्या.
ज्योती ठाकरे, म्हणाल्या शिवसेना महिला आघाडी ही नेहमीच सक्षमपणे काम करत आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राज्यात ‘स्त्री शक्ती संवाद यात्रा’ सुरू केली होती. याला महिलांचा भरभरून प्रतिसाद लाभला. महिलांच्या सुरक्षेबाबत आणि महिला सन्मानाबाबत नेहमीच शिवसेना अग्रेसर होती आणि आहे. आजही आम्ही राज्यातील घराघरातील स्त्री शक्ती पर्यंत पोहचून त्यांच्या सोबत संवाद साधला.
राज्यात शिवसेनेची जी महिला आघाडी आहे या महिला आघाडीला भेटणे आणि नवनियुक्तयांबाबत आढावा घेणे. तसेच शिवसेनेकडे आकृष्ट होणाऱ्यांना सामावून घेणे योग्य पद आणि जबाबदारी वाटून देणे हा एकंदर स्त्री शक्ती संवाद यात्रेचा हेतू आहे. पाच जिल्ह्यात आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक महिला शिवसेनेसोबत जोडल्या गेल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या स्त्री शक्तीच्या माध्यमातून आम्हाला घराघरात शिवसेनेची मशाल पोहचवायची आहे असेही त्यांनी सांगितले.
उपनेत्या छायाशिंदे, संपर्क संघटक रोशनी कोरे गायकवाड, निरीक्षक संजना मुजगेकर आदी शिवसेना प्रमुख महिला पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने यात्रेच्या निमित्ताने आलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या व पदाधिकार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख विमा देशपांडे, झहिदा खान, करवीर महिला संपर्कप्रमुख प्राची पोद्दार, उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत मांढरे, शुभांगी साळुंखे, अमृता सावरकर, तेजश्री पाटील, विद्या गायकवाड, शिल्पा संकपाळ, रूपाली जाधव, माधवी लोणारे, दिपाली शिंदे, मंगला पवार, सुप्रिया पाटील, सुजाता सुतार, धनोत्तरी नरके, पूजा पाटील, अनिता ठोंबरे, गीता गायकवाड, उज्वला दाभोळकर, विजय वागस्कर, मेघा काळे, तेजस्विनी लोहार, वंदना पाटील उपस्थित होते.