कोल्हापूर : खगोलप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यात महत्वाची खगोलीय घटना घडणार आहे. ही घटना डोळ्याने पाहता येणार आहे. 13 – 14 डिसेंबरच्या रात्री ही घटना होणार आहे. आकाशात पूर्व दिशेला उल्का वर्षाव होणार आहे. या उल्का वर्षावाला जेमिनिड्चा उल्का वर्षाव म्हणतात.
जेमिनिडस् उल्कावर्षाव आज दि. 13 रोजी रात्री दिसणार आहे. ते पाहण्याची खगोलप्रेमींना अनोखी पर्वणी असणार आहे. चंद्रप्रकाशामुळे उल्कावर्षाव दिसण्यात थोडा प्रभाव पडत असला तरीही प्रतितास सुमारे 120 उल्का दिसण्याची शक्यता आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अंतराळ संशोधन केंद्राने खगोलीय नजाऱ्याचे खुले निरीक्षण रात्री 8 नंतर आयोजित केले आहे. नागरिक, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी यांनी निरीक्षणात सहभाग घ्यावा, असे आवाहन या केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे.