मुंबई (प्रतिनिधी) : सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत असली तरी भारतीय वायदे बाजारत आज (बुधवार) सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे चिन्हे आहेत.

MCX वर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सोनं 88 रुपयांनी घसरून ते 71 हजार 651 वर स्थिर झाले आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचे दर 71 हजार 739 इतकी होती. चांदीच्या दरातही 180 रुपयांची घट झाली आहे. आज चांदी 88 हजार 900 रुपयांवर स्थिर आहे. तर काल चांदी 89,080 वर स्थिरावली होती.

मागील सत्रात रुपयाची 83.57$वर नोंद झाली होती. मात्र, आता यात रिबाउंड आलं आहे. आज रुपया 83.38/$ वर व्यवहार करत आहे. रुपया मजबूत झाल्यानंतर आज बुलियन्स मार्केटमध्ये तेजी आली असून सोन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाली आहे. अमेरिकेत मौल्यवान धातुच्या खरेदीत वाढ झाली आहे. फेडरल रिझर्व्ह बँक यावर्षी व्याज दरात कपात करणार आहे.

स्पॉट गोल्ड 0.4 टक्क्यांनी वाढून त्याची 2,329 डॉलर प्रति औंसवर नोंद झाली आहे. तर, यूएस गोल्ड फ्युचर्स 0.8 टक्क्यांनी वाढून 2,346 डॉलरवर स्थिरावला आहे.