कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : श्री करवीर निवासिनी आई अंबाबाई ही कोल्हापूर करांची कुलदेवी आहे. महाराष्ट्रातील सर्वांत प्रसिद्ध आणि पूजनीय देवतांपैकी एक असलेली आई अंबाबाईची पूजा सर्वधर्मीय लोक मोठ्या श्रद्धेने करत असतात. आई अंबाबाईचे मंदिर हे दक्षिण भारतातील पांड्य शैलीतील वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे.
श्री अंबाबाई चरणी गोवा येथील भक्त विजयादेवी प्रतापसिंह राणे व प्रतापसिंह राणे, माजी मुख्यमंत्री गोवा राज्य यांनी शुक्रवार दि. 06/09/2024 रोजी 1 सोन्याचा दोन पदरी साज अंदाजे वजन 168.540 मि.ग्रॅम, अंदाजे किंमत 13,76,750/- रुपये व 2 सोन्याचे तोडे एक जोड अंदाजे वजन 200.590 मि. ग्रॅम. अंदाजे किंमत 16,34,267/- अशी एकूण रक्कम रु. 30,11.017/- इतक्या किमतीचे सुवर्णदान श्रीं चरणी अर्पण केले. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव मा. श्री. शिवराज नाईकवाडे उपस्थित होते.