मुंबई (प्रतिनिधी ) : डिजिटल जगात सध्या जवळपास सर्वच लोक ऑनलाईन पेमेंट आपल्या गरजेनुसार करत असतात. त्यामुळे जलद गतीने व्यवहारात वाढ देखील झाली आहे .UPI हा एकमेव डिजिटल युगामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो . गेल्या काही वर्षातच झपाटयाने लोक ह्याकडे आकर्षिले जात आहेत .फक्त एका क्यूआर कोड स्कॅन करून काही क्षणातच पैशांचा व्यवहार हा सहजरित्या करता येतो .कधीकधी असही होतं की ,घाईघाईत आपण चुकीच्या UPI पत्त्यावर पैसे पाठवतो.
चुकीच्या कोडवर गेलेले पैसे ‘अश्या’ मार्गाने परत मिळवा
भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंटबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केलीत .ज्यामध्ये पैसे देणारे आणि पैसे घेणारे दोघेही एकाच बँकेचा वापर करत असल्यास, चुकीच्या UPI कोडवर पाठवलेले पैसे जलद गतीने परत मिळवता येतील . जर पैसे दुसऱ्या बँक खात्यात पाठवले गेले असतील तर, चुकीचे पेमेंट परत करण्यास वेळ लागू शकतो. चुकीचे UPI पेमेंट कसे परत करावे चुकीच्या UPI पत्त्यावर पाठवलेले पैसे परत मिळवण्याचे 5 मार्ग आहेत.
1.प्राप्तकर्त्यास व्यवहार तपशील दर्शवून पैसे परत घेणे.
2.व्यवहाराची सर्व संबंधित माहिती आणि पुरावे शेअर करा. ते परतावा प्रक्रिया सुरू करण्यात मदत करू शकतात.
3.वापरकर्ते ॲपमधील ग्राहक समर्थनाद्वारे समस्येचे निराकरण करू शकत नसतील, तर ते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडे तक्रार करू शकतात.
4.तुमच्या बँकेला चुकीच्या व्यवहाराची माहिती द्या.पाठवलेली रक्कम परत करण्यासाठी चार्जबॅक प्रक्रिया सुरू करण्यात मदत करा.
5.टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करा वरील पर्याय काम करत नसल्यास तुम्ही 1800-120-1740 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करू शकता. तज्ञ तुम्हाला मदत करतील.