टोप ( प्रतिनिधी ) : पुणे बंगलूरु राष्ट्रीय महामार्गालगत शिरोली औद्योगिक वसाहतीतील आयडीबीआय बँकेच्या शेजारी असणाऱ्या महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट जवळ असलेल्या महाराष्ट्र गॅरेज मध्ये गॅस वितरण कंपनीच्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने मोठ्या परिसरात मोठा स्फोट झाला अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर येवून आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला .
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास गॅरेजमध्ये वेल्डिंग काम करून ट्रकची उंची वाढविण्यासाठी गेली चार दिवसापासून ट्रक गॅरेजमधील मोकळ्या जागेत पार्किंग करण्यात आला होता . ट्रकच्या वरून मेन विद्युत लाईन गेल्याने व बाजूला मोठे झाड असल्याने विद्युत लाईटच्या कनेक्शनचा मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होऊन ट्रकवर टिंग्या पडून ही आग लागली . ट्रकची उंची वाढवण्यासाठी गॅस सिलिंडर टाकीचे माप घेऊनच ट्रकचे काम करायचे होते त्यासाठी तिन रिकाम्या टाक्या ट्रकमध्यच होत्या पण त्यातील एक टाकीत किरकोळ गॅस असल्याने किंवा आगीमुळे यातील एका टाकीचा स्फोट झाला असावा असा अंदाज महाराष्ट्र गॅरेजचे मिस्त्रीनी सांगितला .
ट्रकने अचानक पेट घेतल्याने गॅरेजमध्ये कोणीच नसल्याने आगीबाबात कोणालाच माहिती मिळाली नाही पण आग मोठ्या प्रमाणात लागल्याने त्याचा उजेड शेजारीच असणाऱ्या मेनन कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिसताच त्यानी कोल्हापूर येथील आग्नीशमन दलाच्या जवानांना बोलावून आग आटोक्यात आणली आग लवकर आटोक्यात आल्यामुळे शेजारी असणाऱ्या गाड्या बचावल्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेची नोंद रात्री उशीरापर्यंत शिरोली पोलिसात झाली नाही .