कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : श्री गणेशाला विघ्नहर्ता, बुद्धीची देवता अशा विविध नावांनी संबोधले जाते. श्रीगणेशाच्या विविध रूपातील प्रतिकृती ह्या नेहमीच पाहणाऱ्याच्या मनात आपसूकच मांगल्याचा भाव जागृत करत असतात. कलात्मक मूर्ती बनविण्याकरिता अनेक उत्साही कलाकारांचे सतत काही ना काही प्रयत्न सुरूच असतात. त्यांच्या कल्पकतेतून तयार झालेल्या मूर्ती प्रसन्नता आणि चैतन्य फुलवतात.
कोल्हापुरातील या गृहस्थांनी बनविली गूळाची गणेशमूर्ती …
अशाप्रकारची एक मूर्ती कोल्हापुरातील शाहूपुरी येथे वास्तव्यास असणाऱ्या ज्येष्ठ, हौशी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या रघुनाथ पुरेकर यांनी गुळाच्या ढेपेमध्ये गणेशमूर्ती कोरलेली आहे. कल्पकता, परिश्रम, चिकाटी या गुणांच्या आधारावर त्यांनी कोरलेली मूर्ती ही केवळ सुरेख नाही तर मनोबल व प्रेरणादायी आहे. मूर्तीतील सूक्ष्म भाव गुळात साकारण्याकरिता त्यांनी हात व बुद्धीचा योग्यरित्या केलेला वापर हा त्यांच्या कौशल्याला दाद मिळवून देणारा ठरला आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध घटकांपासून मूर्ती बनविण्याचा ट्रेंड आला आहे. गृहिणी, शाळकरी मुले व युवक त्यासाठी वेगवेगळी कल्पकता, तंत्रे वापरतात आणि मूर्ती साकारतात. त्यामध्ये रंगसंगतीचा नेटका वापर केला जातो.
त्यातून साकारल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती लक्षवेधी जरूर आहेत पण वयाच्या 75 व्या वर्षी एक गुळाचा रवा व त्यासाठी टोकदार मोजकी दोन-तीन आयुधे एवढ्याच साधनांवर सलग चार-पाच दिवस गुळाची ढेप कोरणे, ही मुर्ती कोरत असताना त्यात मनाला मिळणारा आनंद शोधणे त्याचबरोबर आडव्या-तिडव्या कोरण्याला या आजोबांनी मूर्तीसाठी घेतलेल्या परिश्रमाचे उत्कृष्ट फलित असल्याचे मूर्ती पाहणारे लोक दाद देत आहेत. सलग 40 वर्षे ते गुळाच्या ढेपेत गणपती मूर्ती साकारत आहेत. ज्यांच्या घरात गुळाचा गणपती पूजला जातो किंवा विवाहात मुलीला रूकवत म्हणूनही दिला जातो.
पंच्याहत्तरी गाठलेली असताना एक गुळाचा रवा आणि त्यासाठी टोकदार मोजकी दोन-तीन आयुधे एवढ्याच साधनांवर सलग चार-पाच दिवस गुळाची ढेप कोरणे, या कोरण्यातच आनंद शोधणे व आडव्या-तिडव्या कोरण्याला या आजोबांनी साकारलेली मूर्ती परिश्रमाचे उत्तम फलित म्हणून पाहणारे प्रेक्षकही दाद देतात.
ही गणेशमूर्ती साकारत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. गुळाला उष्णतेपासून दूर ठेवावे लागते. शिवाय मुंग्या लागू नयेत, याचीही दक्षता घ्यावी लागते. अनेकजण आजही वर्षभरामध्ये या गुळाच्या गणपतीची मागणी करत आहेत.