कळे (प्रतिनिधी) : आधुनिक जीवनशैली मध्ये वाढता ताण तणाव, धावपळ यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत.याच्या अनुषंगाने स्वस्तिक हॉस्पिटल आणि ग्रामपंचायत गोठे यांच्या संयुक्त विद्यमानाने गोठे येथे मोफत हृदयरोग चिकित्सा निदान आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिपाली पाटील होत्या.यावेळी 100 नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.डॉ.अर्जुन आडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्तिक हॉस्पिटलच्या टिमने रुग्णांची मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केले.यावेळी डॉ.सुरेश पाटील, अभिजीत वागवेकर, संदीप मांडवकर, अक्षय गवळी, वैभव कांबळे, रैहबर मकानदार, प्रणाली मोहिते, दिपाली शिंदे आणि आदि ग्रामस्थ उपस्थित होते.