चौघाना चार दिवसांची पोलीस कोठडी तर एका संशयिताचा शोध सुरु

पन्हाळा (प्रतिनिधी) पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथे रविवारी सायंकाळी येथील युवकाचा दांडक्याने मारहान करून खून केल्याची घटना घडली होती.या खुनानंतर फरारी झालेल्या पाच संशयित आरोपीपैकी तिघांना अटक करण्यात पन्हाळा पोलिसांना यश मिळाले असून यातील मुख्य संशयिताला स्थानिक गुन्हे अनवेशन शाखेच्या पाथकाने मध्यरात्री ताब्यात घेतले तर एकजण अद्याप फरारी असून त्याचा शोध चालू आहे. ताब्यात असलेल्या चार संशयितांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.

पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथे रविवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास विकास आनंदा पाटील ( रा. पोर्ले तर्फ ठाणे)या युवकाचा जबरी मारहाणीत खून झाला होता. या गुन्हातील मुख्य संशयित युवराज शिवाजी गायकवाड( रा. पोर्ले तर्फ ठाणे) व त्याचे साथीदार ओंकार शिवाजी वरुटे (रा. आरे ता. करवीर), शरद बळवंत पाटील ( रा. पोर्ले तर्फ ठाणे),सोमनाथ पंडित वरुटे ( रा. आरे ता. करवीर) व पंढरीनाथ कांबळे हे पाच संशयित घटनेच्या दिवसापासून फरारी होते.त्यापैकी ओंकार वरुटे, सोमनाथ वरुटे व शरद पाटील यांना पन्हाळा पोलिसांनी अटक केली. तर मुख्य संशयित आरोपी युवराज गायकवाड याला स्थानिक गुन्हे अनवेशन शाखेच्या पाथकाने ताब्यात घेतले.मात्र पंढरीनाथ कांबळे हा अद्याप फरारी असून त्याचा पोलीस शोधघेत आहेत.यागुन्ह्यात अटक केलेल्या चार संशयित आरोपीना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठाडीत सुनावली.