कोल्हापूर(प्रतिनिधी): भाजपा तर्फे कोल्हापूरातील शास्रीनगर येथील माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्री यांची 120 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा अनुजाती मोर्चा कोल्हापूर,महानगर जिल्हा अध्यक्ष अनिल कामत यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.

यावेळी मोर्चाचे शासकीय योजना समन्वयक रणजीत औंधकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.जयंतीचे संयोजक भाजपा अनु जाती मोर्चा कोल्हापूर महानगर उपाध्यक्ष प्रशांत अवघडे,मोर्चाचे युवा जिल्हाध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी नेतृत्व स्विकारले.या वेळी मोर्चाचे सरचिटणीस सतीश राणे,राहुल गागडे,विजय पोवार,प्रकाश रायमाने,मोर्चाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रवीण शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.