मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. साहव्या टप्प्यात दिल्लीत सात जागांसाठी मतदान होत आहे. तर इतिहासात प्रथमच गांधी कुटुंबाने कॉंग्रेसला सोडून आप ला मतदान केलं आहे. सार्वत्रिक निवडणुकीत गांधी परिवाराने काँग्रेस पक्षाला मतदान न करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दिल्लीत आज सात जागांसाठी मतदान होत आहे. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे दिल्लीचे मतदार आहेत. गेल्या अनेक निवडणुकांत काँग्रेसने या जागेवर आपला उमेदवार उभा केला होता. मात्र यंदा तसं नाहीये. यावर्षी आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे मित्रपक्ष दिल्लीत एकत्र निवडणूक लढवत आहेत. आप आणि काँग्रेसने भाजपविरोधात संयुक्त उमेदवार उभे केले आहेत, अशी दिल्लीतील ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे.

लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे मित्रपक्ष दिल्लीत एकत्र निवडणूक लढवत आहेत. आप आणि काँग्रेसने भाजपविरोधात संयुक्त उमेदवार उभे केले आहेत. दिल्लीत जागावाटप पद्धतीनुसार आप चार तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवत आहे. त्याअंतर्गत नवी दिल्लीतील जागा आपकडे आहे. या जागेवरून आम आदमी पक्षाने सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसने नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे गांधी परिवार आज आप पक्षाचे उमेदवार सोमनाथ भारती यांना मतदान केलं आहे.

दरम्यान राहुल गांधी यांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर पोस्ट केली आहे. त्यांनी सर्वांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.तुमचं मत तुमचं जीवन तर सुधारेलच पण लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करेल. लोकशाहीच्या या महान उत्सवात आई आणि मी मतदान करून हातभार लावला आहे. तुम्ही सर्वांनीही मोठ्या संख्येने घराबाहेर पडा, तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केलं आहे.