कोल्हापूर (प्रतिनिधी) : सशस्त्र सेना आणि ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ आणि विजय दिवस कार्यक्रम सोमवार 16 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता महासैनिक दरबार हॉल आणि लॉन येथे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे. गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्याने ध्येयपूर्तीच्या अधिक 124 टक्के निधी संकलन करून राज्यात तिसरा क्रमांक मिळविला होता.