कोल्हापूर (प्रतिनिधी) : 26 नोव्हेंबर पासून भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सुरु झाला आहे. आपल्या देशात संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. संविधानाची मूल्ये जन लोकांमध्ये रुजविण्यासाठी तसेच भारतीय संविधानाच्या मूलभूत विचारांची जनजागृती करण्यासाठी भारतीय संविधान जनजागृती अभियान आणि संविधान प्रेमी जनतेच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये वर्षभरात 75 संविधान अंमलबजावणी परिषदा होणार आहेत. आपला अभिमान, भारतीय संविधान ही भूमिका घेऊन पहिली संविधान अंमलबजावणी परिषद रविवार दि. 15 डिसेंबरला दुपारी 1:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत समन्वयक सुरेश केसरकर यांनी दिली.

सदर परिषदेस माजी आ. राजीव आवळे, संविधानाचे अभ्यासक आणि कायदेतज्ञ ॲड. कृष्णा पाटील, ॲड. सचिन आवळे, संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते डॉ. नंदकुमार गोंधळी, विद्याधर कांबळे, रिपब्लिकन सेनेचे नेते अर्जुन कांबळे, बाबासाहेब कामत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पांडुरंग कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे एम. व्ही. ऐनीकर, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सुरेश केसरकर, संजय सासने, भारतीय दलित महासंघाचे श्रीकांत कांबळे, लोकराज्य जनता पार्टीचे अनिल चव्हाण, युवा आंबेडकरवादी क्रांतीदलाचे सनी गोंधळी, धम्म चळवळीचे अभ्यासक अमित मेधावी, विजय कुशाण, अण्णा ब्रिगेडचे डॉ. अमोल महापुरे, दलित महासंघाचे प्रकाश कांबळे, बंडखोर सेनेचे शिवाजीराव आवळे, लहुजी साळवे प्रतिष्ठानचे अक्षय साळवे, जागृत नागरिक सेवा संस्थेचे भगवान माने, संभाजी थोरात सहभागी होणार असून अनिल म्हमाने,

ॲड. करुणा विमल, मदन पवार, प्रा. टी. के. सरगर, डॉ. शोभा चाळके, मारुती गायकवाड, अनिता काळे, प्रशांत आवळे, विश्वासराव तरटे, अंतिमा कोल्हापूरकर, गोपाळ कांबळे, महादेव चक्के, शिवाजी चौगुले, सिकंदर तामगावे, लालासो नाईक, सुशीलकुमार प्रज्ञावंत, विनोद कांबळे, नारायण कांबळे, भिमराव धर्मवीर, एन. एम. नाईकवाडे, जी. एस. कांबळे, समन्वयक आहेत. सदर परिषदेस संविधान प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अनिल म्हमाने, निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती फिल्म क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस संजय सासने, मदन पवार, शिवाजी चौगुले, सिकंदर तामगावे, मारुती गायकवाड उपस्थित होते.