मुंबई(प्रतिनिधी):बिग बॉसच्या घरात निक्कीने आधीचं धारेवर धरलेल्या संग्रामसोबत मैत्री केली आहे.बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासून आतापर्यंत वेगवेगळी घडामोडी पाहायला मिळत आहेत.पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात दोन टीम पडल्या आहेत.निक्की आणि जान्हवी एकमेकींच्या खास मैत्रिणी बनल्या होत्या.पण आता त्या दोघी एकमेकींच्या विरोधात उभं असल्याचं दिसत आहे.निक्की आणि अरबाज मध्येही काही कारणामुळे वाद झाला होता पण तो वाद मिटवला आणि त्यांची पुन्हा मैत्री झाली.
बिग बॉस मराठीच्या घरात आतापर्यंत अनेक गोष्टी बदलल्या आहेत.तर आता वाइल्ड कार्ड सदस्याच्या एन्ट्रीनंतर सर्व गोष्टी बदलण्याची शक्यता आहे.बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून संग्राम चौगुलेने एन्ट्री केली. पहिल्याच दिवशी संग्रामने अरबाज आणि निक्कीशी वाद घातला.तर यानंतर निक्की आणि अरबाज,संग्रामसोबत वाद घातला संतापजनक वातावरण निर्माण झाले.पण आता निक्की संग्रामसोबत मैत्री करताना दिसत आहे.
निक्की आणि संग्रामची होतेय मैत्री…
अरबाजच्या मागे निक्की संग्रामसोबत गप्पा मारत बसल्याच दिसत आहे.कॅप्टन्सी टास्कमध्येही निक्कीने संग्रामला बाय केले आहे.निक्की संग्रामला म्हणते की ‘तुमच्याकडून मला फ्रेंडली वाईब आली.जर तुम्ही मला फ्रेंडली वाईब देताय, तर मी उगाच तुमच्या वाकड्यात का जाऊ, ते ही फक्त अरबाजमुळे?’ अस निक्की म्हणतेय.तर आता निक्की आणि संग्रामची मैत्री राहणार की नाही असा प्रश्न पडला आहे.याकडे सर्वांच लक्ष लागुन राहील आहे.जर या दोघांची मैत्री झाली तर, अरबाज आणि ‘टीम बी’ चं कसं होणार, हे पाहायला मज्जा येणार आहे.बिग बॉसच्या घरातील सगळ्या गोष्टी बदलायला वेळ लागणार नाही.