कळे ( प्रतिनिधी ) : कळे ( ता.पन्हाळा ) येथे फडाला आग लागलेल्या आगीत दोन एकरातील ऊस जळून सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले. दरम्यान, गावात प्रशाळेत स्नेहसंमेलनासाठी आलेले तरुण, वन विभाग, महावितरण, महसूल विभाग व ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण येऊन मोठी हानी टळली.
कळे-पुनाळ मार्गालगत कळे येथे भू गट क्रमांक १०६९ दहाबिघा नावाची शेती आहे. यात संबंधित शेतकऱ्यांनी ऊस पीक घेतले आहे. शुक्रवार दि.१३ रोजी. दुपारी दोनच्या सुमारास उसाच्या फडाला आग लागली. यात संबंधित रवळनाथ देशपांडे, हिंदुराव पाटील, विलास पाटील या शेतकऱ्यांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले.