आजरा (प्रतिनिधी ): आजऱ्यातील पेंढारवाडी येथे शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीत उभे गवत, गवत गंजी,2 एकर क्षेत्रातील ऊस,अर्धा एकर क्षेत्रातील तुर, आंब्याची 20 झाडे जळून खाक झाली.

रमेश लोखंडे, प्रभाकर आजगेकर, धोंडीबा लोखंडे, मारुती लोखंडे आदिंचे यामध्ये नुकसान झाले. तलाठी अजीत बेळवेकर, पोलीस पाटील सुभाष आजगेकर, कोतवाल शिवाजी चव्हाण यांनी जळीताचा पंचनामा केला. आग लागलेली समजताच संपूर्ण पेंढारवाडी ग्रामस्थ मदतीला धावले. नागरिकांनी झाडाच्या फांद्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

अज्ञाताने सदर आग लावली असावी अथवा ऊस गेल्यानंतर पेटवलेल्या फडाद्वारे ही आग पसरली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.