अमरावती : गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नुकतेच अमरावती विमानतळावर आगमन झाले आहे.
अमरावतीकरांचा पहिला विमान प्रवास
यावेळी 72 सीट आसनी असलेले पहिलं विमान अमरावती विमानतळावर दाखल झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्रीसह महायुतीतील अनेक प्रमुख नेते या उद्घाटन सोहळ्याला हजार राहणार आहेत. या विमानात पहिला प्रवास करणाऱ्या अमरावतीकरांना मोठी उत्सुकता लागलेली आहे.
दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र
विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरु होणार असल्याची माहिती आली आहे. येत्या जुलै महिन्यापासून हे प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे.
प्रमुख नेत्यांची हजेरी
यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, नवनीत राणा यांच्यासह विरोधी पक्षातील नेते ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.