निपाणी (प्रतिनिधी) : यरनाळ येथील चर्चेत असलेल्या ग्राम पंचायत मनरेगा योजनेतून बांधण्यात आलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते तसेच ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मीबाई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संभाजी गायकवाड यांनी, पंचायतीचा कार्याचा आढावा सांगितला. तसेच डोंगरी भागातील आरोग्य आणि रस्त्यांची समस्या मांडून प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केली.
उत्तम पाटील यांनी, राजकारण हे लोंकाच्या हित साधण्यासाठी केले पाहिजे. आम्ही कायमस्वरूपी जनतेच्या तसेच येथील गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी माजी आ. सुभाष जोशी, माजी आ. वीरकुमार पाटील, माजी आ. काकासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी ब्लॉक कॉग्रेसध्यक्ष राजेश कदम, रोहन साळवे, माजी ज़ि.प. उपाध्यक्ष पंकज पाटील, निपाणी नगरपालिकेचे पदाधिकारी, मान्यवर उपस्तिथ होते.