मुंबई : सणासुदीला सोने हमखास खरेदी केले जाते.तर सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असतात.तर आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 4 नोव्हेंबर रोजी आज भारतात सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम 7,369 रुपये आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 8,039 रुपये प्रति ग्रॅम आहे. 3 नोव्हेंबरला 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,370 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,040 रुपये प्रति ग्रॅम होती.तर भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,690 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,390 रुपये झाला आहे.

भारतात आज सोन्याच्या किंमतीत किंचीत घसरण झाली आहे.मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,039 रुपये प्रति ग्रॅम आहे.काल मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 7,370 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,040 रुपये प्रति ग्रॅम होता.मुंबईत आज चांदीचा भाव 96.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 96,900 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.