कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी दि.१६ सप्टेंबर रोजी असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. काही जिल्ह्यात ही सुट्टी इतर दिवशी जाहीर करण्यात आली आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात ईद ची सार्वजनिक सुट्टी या अगोदर घोषित केल्यानुसार दि.16 सप्टेंबर रोजी असणार आहे.
सोमवारी ईदची सार्वजनिक सुट्टी असून मंगळवारी दि. 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी दिवशी शासकीय सुट्टी नसून सर्व आस्थापना नेहमी प्रमाणे सुरु राहतील असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.