नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि नागपूरमधील सुमारे 35 ठिकाणांची झडती घेत छापेमारी केली. ही छापेमारी अमटेक ग्रुप आणि त्यांच्या संचालकांवर मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून करण्यात आली आहे. यात 20,000 कोटींहून अधिक रुपयांची कथित बँक कर्ज फसवणूक केल्याचा आरोप आहे.

अमटेक ग्रुप आणि त्यांच्या संचालकांवर ईडीचा छापा टाकण्यात आला. यामध्ये अरविंद धाम, गौतम मल्होत्रा ​​आणि इतरांची नावे आहेत. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई आणि नागपूर येथील सुमारे 35 व्यावसायिक आणि निवासी परिसरांवर छापे टाकण्यात आले आहेत. आमटेक ग्रुपच्या एसीआयएल लिमिटेड या युनिटच्या विरोधात सीबीआयच्या तपासातून या तपासाला सुरुवात झाली.

सुप्रीम कोर्टानेही ईडीकडे चौकशीची मागणी केली होती

सूत्रांनी सांगितले की, आमटेक ग्रुपचे युनिट असलेल्या ‘एसीआयएल लिमिटेड’ विरुद्ध सीबीआय एफआयआरपासून ही चौकशी सुरू झाली आहे. तपासात अनेक सूचीबद्ध कंपन्यांमध्ये 20,000 कोटी रुपयांहून अधिक बँक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. सुप्रीम कोर्टानेही ईडीच्या चौकशीची मागणी केली होती, अशी माहिती पुढे आली आहे. सूत्रांनी सांगितले की, ईडीच्या म्हणण्यानुसार, यामुळे सरकारी तिजोरीचे सुमारे 10,000 -15,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीत असेही म्हटले आहे की, अधिक कर्ज मिळविण्यासाठी, समूहाने बनावट विक्री, भांडवली मालमत्ता, कर्जदार आणि नफा दाखवला जेणेकरून त्याला अनुत्पादित मालमत्तेचा टॅग मिळू नये. यासोबतच लिस्टेड शेअर्समध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप करण्यात आला.