कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, राज्यात कोणती जागा कोण लढवेल हे वरिष्ठ नेते ठरवतील. तसेच जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेला सरकारकडून काय अपेक्षा आहेत ,शिवसेना याआधी कोणत्या जागावर निवडणूक लढली होती.त्याचबरोबर सद्य स्थिती काय आहे, विद्यमान आमदाराची स्थिती काय आहे या सर्वांची माहिती एकत्रित करून तो अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला जाईल. त्याचबरोबर ते असं देखील म्हणाले की, विरोधकांनी लाडकी बहिण योजनेचा धास्ती घेतली आहे.
पत्रकारांनी कोणता प्रश्न विचारला शिंदेना..?
पत्रकारांनी खा. शिंदे यांना प्रश्न विचारला की, विरोधकांचे आव्हान तुमच्यासमोर आहे. कोल्हापूरमधील किती जागावर तुमचा दावा आहे .? व महायुतीचे सरकार असतानाही कार्यकर्त्यांना समितीवर डावलले जात आहे यावर श्रीकांत शिंदे म्हणाले की, इथे कोणत्याही जागेवर दावा करण्यासाठी आलो नाही असं सांगितलं.
लोकसभेला विरोधकांनी चुकीचा प्रचार करून देखील हातकणंगले ची जागा विजयी झालोच. महायुतीसाठी कोल्हापूरचे वातावरण चांगले आहे. ज्या कार्यकर्त्यांना नियुक्ती हवी आहे ,ती दिली जाईल. यावेळेस राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर,खा. धैर्यशील माने, माजी खा. धनंजय मंडलिक, माजी आ.चंद्रदीप नरके उपस्थित होते.