इचलकरंजी (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांचं रणांगण सुरू झालयं. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आज गुरूपुष्यामृत योग असल्यामुळे अनेकांनी या मुहुर्तावर आपले अर्ज दाखल करण्याची रेलचेल सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच, प्रचंड शक्ती प्रदर्शन करत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. राहूल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


महायुती सरकारची मजबूत कामगिरी आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील असलेली जनतेची साथ या जोरावर डॉ. राहुल आवाडे हे नक्कीच विजयी होतील असा विश्वास धनंजय महाडिक यांनी यावेळी व्यक्त केला.


यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, रविंद्र माने, अमृत भोसले, अशोक स्वामी, माजी आमदार सुरेश हळवणकर, तानाजी पवार, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.