कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमधील डॉक्टर आणि प्रशसासकाला लाच घेताना पोलीसांनी रंगेहाथ अटक केलीय.अजित वसंतराव पाटोळे (वय ४९, रा. साधना हायस्कूल जवळ, संभाजीनगर, गडहिंग्लज) असे याचे नाव आहे. तर इंद्रजीत शिवाजीराव पाटोळे (वय ४८,रा.मिसाळ चाळ,आझाद रोड गडहिंग्लज) या दोघांना अटक केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मित्र हा दिनांक 10 जानेवारीरोजी सायंकाळच्या सुमारास चक्कर येऊन खाली पडल्याने त्याच्या डाव्या खुब्याला मार लागला. त्याला सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी 13 जानेवारीरोजी गडहिंग्लजमधील स्वराज्य हॉस्पिटल येथे अॅडमिट केले. तेथले वैद्यकीय अधिकारी डॉ.अजित पाटोळे यांनी हे ऑपरेशन महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून करण्याचे ठरवले.

यावेळी हे ऑपरेशन शासकीय योजनेतून मोफत करण्याकरता वीस हजार रुपये द्यावे लागतील, तरच ऑपरेशन होईल असे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी 15 जानेवारीला दहा हजार रुपये डॉ.अजित पाटोळे यांना दिले. त्यानंतर 16 जानेवारीला त्या व्यक्तीचे ऑपरेशन झाले. मात्र, ही शासकीय योजना आणि योजनेअंतर्गत केलेले औषधोपचार हे पूर्णपणे मोफत आहेत. तरीसुद्धा या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या हेतूने आरोपी अजित पाटोळे आणि इंद्रजित पाटोळे यांनी तक्रारदाराकडे 20 हजारांची मागणी केली. यावेळी झालेल्या तडजोडीनंतर ही रक्कम 18 हजारांवर आणण्यात आली.

या रक्कमेपैकी 10 हजार दिल्यानंतर आज (सोमवार) उर्वरीत रक्कमेचे 8 हजारांची लाच घेताना पोलीसांनी सापळा लावत आरोपींना रंगेहाथ अटक केलीय. ही कारवाई पोलीस निरीक्षक बापू साळुंखे,सहा पो. उपनिरीक्षक सुनील मोरे , पो. हवालदार, पो. हवालदार संदीप काशीद,पो.नाईक सचिन पाटील,पो.कॉन्स्टेबल-संदीप पवार, सहा.फौजदार गजानन कुराडे यांनी केली.