दूध हे कॅल्शियमच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. हे निरोगी आणि पौष्टिक आहे आणि ते आपली हाडे मजबूत ठेवते. लोक सध्या दुधाची चव आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी बरेच प्रयोग करतात. दुधाचा वापर करून तयार केलेली सर्वात आवडती पाककृती म्हणजे बदाम दूध. बदाम हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपोयोगी असते. योग्य प्रमाणात खाल्ल्यास बदामामुळे शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. बदामाप्रमाणेच त्याचे दूध देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. बदाम दूध जेवढ चवीला छान लागते तेवढ तिचे आरोग्यदायी फायदे सुद्धा जबरदस्त आहेत…
तर चला जाणून घेऊया आरोग्यदायी फायदे..!
त्वचेसाठी उपयुक्त : बदामाचे दूध प्यायल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. बदामाच्या दुधात असणारे व्हिटॅमिन-डी त्वचेचा सुर्याच्या अतिनील किरणांपासून आणि हानिकारक बॅक्टेरियापासून बचाव करते तर व्हिटॅमिन-ईमुळे त्वचेला एक प्रकारचे संरक्षण कवच प्राप्त होते. यामुळे त्वचेचे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.
डोळ्यांसाठी फायदेशीर : बदामाचे दूध डोळांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. यात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-डी आणि रिबोफ्लेविनसारखे डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले घटक आढळतात. त्यामुळे मोतीबिंदूसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होऊ शकते.
केसांसाठी फायदेशीर : केसांसाठी बदाम जसे फायदेशीर असतात तसेच निरोगी आणि लांब केंसासाठी बदामाचे दूध खूप फायदेशीर ठरू शकते. यात आढळणारे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि टोकोफेरॉलसारखे घटक केसांसाठी अतिशय उपयुक्त असतात.
हाडांसाठी उपयुक्त : बदामाच्या दुधात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शियम आढळते. त्यामुळे हे दूध पिल्याने हाडे मजबूत होण्यासाठी आणि हाडांचा विकास होण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे बदामाचे दुध मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते.