पाणी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचे आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. त्यामुळेच पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. एकवेळा माणूस अन्नाशिवाय थोडे दिवस जगू शकले, मात्र पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत आहे. तुम्ही बसलेले असाल किंवा जेवत असाल किंवा पडून किंवा उभे असाल त्यावेळी योग्य पध्दतीने पाणी पिणे महत्वाचे आहे. प्रत्येकाला दररोज 2 लिटरपेक्षा जास्त पाणी पिण्याची गरज असते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर जेवढे जास्त पाणी आपण पितो, तेवढे ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळेच नेहमी आपण पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे.

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

जर तुम्ही बसून पाणी प्याल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय पाणी सिप करून प्यावे. यामुळे पाणी शरीरात योग्य पद्धतीने पोहोचते

उभे असताना पाणी पिण्याने होणारे तोटे

पचनक्रिया
उभे राहून पाणी थेट पोटात पोहोचते, ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे तुमची पचनक्रिया विस्कळीत होऊ शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते. असे घडते कारण जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा पाणी लवकर पोटात जाते आणि खालच्या भागात दुखापत झाल्यामुळे पचनसंस्था बिघडते.

किडनी
उभे राहून पाणी प्यायल्याने किडनीच्या आजाराचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही किडनीच्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही उभे राहून पाणी पिऊ नये कारण यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. त्याचबरोबर असे केल्याने तुमच्या किडनीचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे आरामात बसून पाणी प्यायले तर बरे होईल.

फुफ्फुस

फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त असाल तर उभे राहून पाणी पिणे टाळा. कारण जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे फुफ्फुस आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.