निपाणी (प्रतिनिधी) : कर्नाटक सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत नांगनूर मराठी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष रणजीत पोवार, सदस्य बाबासो खदरे यांच्या हस्ते मोफत समवस्त्र वितरित करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. बी. धारव, शिक्षक वृंद उपस्थित होते.

कर्नाटक सरकारच्या धोरणानुसार सन 2024-25 सालाकरिता शालेय विद्यार्थ्यांना समवस्त्र दिले जातात. यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन सेट वितरित केले असून इयत्ता सहावी आणि सातवीतील विद्यार्थिनींसाठी नेहमीपेक्षा वेगळा ड्रेसकोड समवस्त्र रूपात मिळालेला आहे. प्रत्येकी दोन सेट मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.