कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात होणारा मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती पाहता अनेक नागरिकांना घरातून बाहेर पडताना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीची गरज असते. ही गरज लक्षात घेऊन युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांच्या नियोजनातून सुमारे 75 छत्र्यांचे वाटप नागरिक आणि विद्यार्थ्यांना करण्यात आले.
हा कार्यक्रम कोल्हापूरातील शाहू स्मारक भवन इथे संपन्न झाला. यावेळी युवासेना विस्तारक विशाल विचारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुंरे, विशाल देवकुळे, मंजित माने, रीमा देशपांडे, जिल्हा चिटणीस अमित बाबर, योगेंद्र माने, संतोष कांदेकर, चैतन्य देशपांडे, बंडा लोंढे,योगेश लोहार, राकेश चौगुले, अक्षय घाटगे, प्रथमेश देशिंगे, अभिषेक दाबाडे, रोहित वेढे, सानिका दामूगडे, राजेश्री मिणचेकर, शशिकांत बिडकर आदी उपस्थित होते.