मुंबई ( प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने बाजी मारली. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. असे असले तरी अद्यापही खातेवाटप जाहीर करण्यात आले नाहीत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत शिवसेनेला किती खाती मिळणार याबाब चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. खातेवाटपामध्ये शिवसेनेला 10 कॅबिनेट मंत्रीपद तर 3 राज्यमंत्री आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7 कॅबिनेट मंत्रीपद तर 3 राज्यमंत्री पद मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 आणि 12 डिसेंबर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता होती. मात्र, मंत्र्यांच्या नावांची निवड, तीनही नेत्यांची नावांवर चर्चा आणि मग केंद्रातून मंजुरी या प्रकियेला वेळ लागण्याची शक्यता आहे.