बाचणी : बाचणी ता. कागल येथे ग्रामस्थांनी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. पंढरपूरला निघालेल्या दिंडीचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेतले. मंत्री मुश्रीफ गळ्यात विना घेऊन वारकऱ्यांच्या समवेत दिंडीत सहभागी झाले. विठोबा – रखुमाईच्या गजरात सारा गाव दुमदुमून गेला.

या दिंडीत न्यू हायस्कूल, दिशा अकॅडमी, ज्ञानप्रबोधिनी, शांती गुरुकुल इंग्लिश स्कूल या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच सूर्यकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, प्रकाश पाटील, राजेंद्र सुतार, रामचंद्र पाटील, अंकुश हातकर, हिंदुराव पाटील, राजेंद्र सुतार, विठ्ठल खामकर, एम. एस. खामकर, बाबुराव पाटील, नामदेव सडोलकर, रेखा पाटील, पांडुरंग पाटील, अंजना सुतार आदी वारकरी बंधू- भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.