मुंबई : गायक दिलजीत दोसांझ हा पंजाबी सुपरस्टार आहे. दिलजीत दोसांझने बरेच हिट सॅाग केले आहेत. त्यांने अनेक चित्रपटामध्ये आपली गाणी गायली त्याचबरोबर चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. दिलजीत दोसांझचा चाहता वर्ग देखील खुप मोठा आहे. चंदिगडमधे दिलजीत दोसांझने लाईव्ह शो केला होता. त्यावेळी 14 डिसेंबरला चंदिगड मधील आपल्या लाईव्ह शोमध्ये दिलजीत दोसांझने ही घोषणा केली आहे की जोपर्यंत कॉन्सर्टसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा योग्य प्रकारे विकसित केल्या जात नाहीत तोपर्यंत आपण भारतात एकही कॉन्सर्ट करणार नसल्याचे त्याने सांगितले आहे.
शनिवारी दिलजीतने चंदीगडमध्ये परफॉर्म केले होते. यावेळी त्याने त्याचा दिल-लुमिनाटी कॉन्सर्ट आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा जागतिक चॅम्पियन झालेल्या गुकेश डोम्माराजूला समर्पित केला. गुकेशने लहानपणापासूनच त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केलेल्या मेहनतीची आणि समर्पणाची त्याने कौतुक देखील केले. दिलजीत दोसांझ पंजाबीमध्ये बोलत म्हणाला की, “येथे आपल्याकडे लाईव्ह शोसाठी पायाभूत सुविधा नाहीत. हा मोठा महसूल मिळवण्याचा स्त्रोत आहे. अनेक लोकांना यामुळे काम मिळतं आणि येथे काम करु शकत आहेत. पुढील वेळी मी स्टेज मध्यभागी असेल यासाठी प्रयत्न करेन, जेणेकरुन तुम्ही सर्व प्रेक्षक आजुबाजूला असाल. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही हे नक्की” असे तो यावेळी बोलत असताना म्हणाला.