कळे ( प्रतिनिधी ) : मल्हारपेठ येथे आयोजित केलेल्या मल्हारपेठ  प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ध्रुव फायटरने प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय आमदार फायटर, तृतीय जय हनुमान स्पोर्ट्स तर चतुर्थ क्रमांक कीर्ती ध्वज स्पोर्ट्सने पटकाविला विजेत्या संघांना अनुक्रमे 8 हजार आणि चषक, 5 हजार आणि चषक, 2 हजार आणि चषक, 2 हजार आणि चषक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. 

बेस्ट बॉलर विशाल पाटील,  बेस्ट बॅट्समन रोहित पाटील तर मालिकावीर म्हणून आकाश महाजन यांना गौरविण्यात आले.  मल्हारपेठ  येथील गणेश काळे आणि सर्व तरुण मंडळांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमास गणेश काळे, ग्रामपंचायत माजी सदस्य सुदर्शन पाटील,  शिवसेना पन्हाळा तालुका अध्यक्ष अरुण पाटील, माजी सरपंच सिताराम सातपुते, पांडुरंग नारकर, प्रशांत नारकर, ओमराज नारकर, नवनाथ बुचडे,  मच्छिंद्र महाजन आदी उपस्थित होते.