मुंबई(प्रतिनिधी):धर्मवीर-2 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस आलेला दिसून येत आहे.धर्मवीर-2 ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस पडला असून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

धर्मवीर-2 या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल मंगेश देसाई यांनी केली असून लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे.या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रसाद ओक, क्षितीश दाते दिसणार आहेत.चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडत आहेत.धर्मवीर-2 चित्रपट हा मराठी व हिंदी या दोन भाषेमध्ये देशभरात प्रदर्शित होणार आहे.धर्मवीर-2 या चित्रपटातील संगीत दिग्दर्शन चिनार महेश आणि अविनाश विश्वजीत यांनी केले आहे.धर्मवीर-2 मध्ये आनंद दिघे यांची विविध रूपे दाखवली गेली आहेत.

धर्मवीर पार्ट-1 ला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता.त्यातील गाणी हिट झाली होती.प्रसाद ओक यांनी चांगली भूमिका केली होती.प्रेक्षकांना खूप आवडली होती.आता प्रेक्षकांना धर्मवीर-2 बघण्याची उत्सुकता लागली आहे.प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.