कोल्हापूर (प्रतिनिधी) : धनगर आरक्षणासाठी २ ऑक्टोबरला धनगर आरक्षण गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे. ताराबाई चौकातील अक्षता मंगल कार्यालयात परिषद होईल. यासाठी समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी, आजी, माजी मंत्री, खासदार, आमदारासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती धनगर आरक्षण समन्वय समितीचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, २ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून परिषदेला सुरूवात होईल. परिषदेत आरक्षणासंबंधी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल.