कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची लाडकी वाहिनी म्हणजेच ‘कलर्स मराठी’ वर दत्तजयंतीनिमित्त होणार भक्तिमय वातावरण येत्या रविवारी प्रेक्षकांसाठी भक्तीमय पर्वणी घेऊन येत आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’,’आई तुळजाभवानी’ आणि ‘इंद्रायणी’ या मालिकांमध्ये दत्तजयंती निमित्त विशेष भाग दाखवले जाणार आहेत. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेमध्ये स्वामींची दत्तरुपी दर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेमध्ये देवीच्या रक्षणासाठी त्रिदेव भूतलावर अवतार घेणार आहेत.

तर ‘इंद्रायणी’ या मालिकेत दत्तजयंती इंदूचे कीर्तन पाहायला मिळणार आहे. तर एकंदरीत 15 डिसेंबरला दुपारी १२ वाजल्यापासून ‘कलर्स मराठी’ वर भक्तीमय वातावरणचा अनुभव घेता येणार आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेचा श्री दत्त जयंती विशेष महाएपिसोड दत्तभक्तांसाठी आनंद देणारा ठरणार आहे. या भागात स्वामींच्या अलौकिक श्रीदत्त रुपाचे मनोहारी दर्शन प्रेक्षकांना घडेल. तर याचबरोबर ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत येत्या दत्तजयंतीला त्रिमूर्तींच्या साक्षीने आई भवानीने कद्दरासुराला दिलेल्या आव्हानाची न भूतो न भविष्यती अशी रोमांचक गोष्ट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

त्यामध्ये ब्रम्हा – विष्णु – महेश या त्रिदेवांनी त्रिमूर्तीं स्वरूपात प्रकट होणार आहेत असा एक अत्यंत अद्भुत चमत्कार आणि दैवी लीलांचा समावेश असलेला श्री दत्त जयंती विशेष महाएपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘इंद्रायणी’या मालिकेत महाएपिसोडमध्ये गावावरचं भूताचं संकट इंदू आणि फंट्या गँग मिळून एकत्र नाटक करुन सगळ्यानं समोर आणणार आहेत. गावार आलेले अंधश्रद्धेचे मोठं वादळ दूर केल्याने इंदूचं कौतुक होणार आहे. तर यानिमित्ताने गावकरी इंदूला कीर्तन करण्याचा आग्रह करणार आहेत. तर 15 डिसेंबरला प्रेक्षकांना आवडीच्या मालिकांचे दत्तजयंती विशेष एका तासाचे महाएपिसोड आपल्या ‘कलर्स मराठी’ वर पाहायला मिळणार आहेत.